श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 110 – पायवाट ☆
धुंद पहाटेच्या वेळी
पायवाट ही जागली।
लाल केशरी रंगानी
काया हिची तेजाळली।
चकाकती पानोपानी
दवबिंद मोत्यावानी।
मुग्ध गंध उधळण
केली प्राजक्त फुलांनी।
ताल धरून चालती
सर्जा राजाची ही जोडी।
घुंगराच्या नादासवे
बळीराजा तान छेडी।
कळपाने गाई गुरे
कशी डौलात निघाली।
खोडकर गोपालाची
शीळ रानात निमाली
रोजचीच पायवाट
पुन्हा नटली नव्याने।
जणूकात टाकलेली
चाले नागीन तोऱ्याने।
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈