सुश्री दीप्ती कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ पंढरीची वारी… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी☆
वारी चालली हो
चंद्रभागे तीरी
एकमुखे गाती हो
नाम जप हरी।।१।।
शोभतसे भाळी
चंदनाची उटी
तुळसीमाळा गळी
कर ते हो कटी।।२।।
वैष्णवांच्या गजरी
दुमदुमे पंढरी
पायी चाले वारी
विठाईचे द्वारी।।3।।
वैष्णवांची भक्ती
विठुराजा प्रती
नाम हीच शक्ती
लाख मुखे गाती।।४।।
सावळी विठाई
गुण गावे किती
मूर्ती साजरी ती
भक्त साठविती।।५।।
© सुश्री दीप्ति कुलकर्णी
कोल्हापूर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈