श्री कपिल साहेबराव इंदवे
(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है. आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है. एक युवा लेखक के रुप में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते. हमें यह प्रसन्नता है कि श्री कपिल जी ने हमारे आग्रह पर उन्होंने अपना नवीन उपन्यास “मित……” हमारे पाठकों के साथ साझा करना स्वीकार किया है। यह उपन्यास वर्तमान इंटरनेट के युग में सोशल मीडिया पर किसी भी अज्ञात व्यक्ति ( स्त्री/पुरुष) से मित्रता के परिणाम को उजागर करती है। अब आप प्रत्येक शनिवार इस उपन्यास की अगली कड़ियाँ पढ़ सकेंगे।)
इस उपन्यास के सन्दर्भ में श्री कपिल जी के ही शब्दों में – “आजच्या आधुनिक काळात इंटरनेट मुळे जग जवळ आले आहे. अनेक सोशल मिडिया अॅप द्वारे अनोळखी लोकांशी गप्पा करणे, एकमेकांच्या सवयी, संस्कृती आदी जाणून घेणे. यात बुडालेल्या तरूण तरूणींचे याच माध्यमातून प्रेमसंबंध जुळतात. पण कोणी अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून झालेल्या या प्रेमाला किती यश येते. कि दगाफटका होतो. हे सांगणारी ‘मित’ नावाच्या स्वप्नवेड्या मुलाची ही कथा. ‘रिमझिम लवर’ नावाचं ते अकाउंट हे त्याने इंस्टाग्रामवर फोटो पाहिलेल्या मुलीचंच आहे. हे खात्री तर त्याला झाली. पण तिचं खरं नाव काय? ती कुठली? काय करते? यांसारखे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत. त्याची उत्तरं तो जाणून घेण्यासाठी किती उत्साही आहे. हे पुढील भागात……”
☆ साप्ताहिक स्तम्भ #3 ☆ मित….. (भाग-3) ☆
(मनावर आधीराज्य गाजवणारं, हक्काने रागावणारं, रूसणारं आणि तळमळत असलेल्या मनाला हळूच स्थिर करणारं असं कोणीतरी प्रत्येकाच्या आयुष्यात येतं आणि सा-या जीवनाचा थकवा एका क्षणांत घालवून जातं. अशीच सोशल मिडिया अॅप द्वारे ओळख झालेली रिमझिमही आता मनाने मितच्या जवळ येऊ लागली आहे. आणि मित तर तिचा फोटो पाहताच तिच्या प्रेमात पडलाय. मैत्री पर्यत ठीक पण प्रेम ते ही कधीही न पाहिलेल्या व्यक्तीवर? हे शक्य आहे का?? असे एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात उठताहेत. ती खुप विचार करतेय. पण त्याच्या शब्दांवर तीही भाळतेय. हे आकर्षण तिचं प्रेमात बदलू शकतं का?? हे आपण पुढील भागात पाहू…..
एक महिना झाला होता मितला घरी येऊन. बाबांच्या आजाराचं डाॅक्टरांनी नुकतंच निदान केलं होतं. डाॅक्टरांनी त्यांना पुर्णवेळ आरामाचा सल्ला दिला होता. मित शिक्षित होता. म्हणून बाबांना दवाखान्यात ने-आण करणं. औषध वगैरे वेळेवर देणं हे सगळं मितच बघत होता. म्हणून मागच्या महिन्याभरात तो होस्टेलला परतला नव्हता. विद्यापीठाच्या अगामी युवारंग महोत्सवासाठी त्याने जे नाटक लिहीलं होतं. त्याच्या तयारीसाठी तो संघरत्न आणि बाकीही त्याच्या टीमच्या संपर्कात होताच. त्याच्या गैरहजरीत श्रोतीका आणि प्रियंका उत्तम प्रकारे ते नाटक बसवत होत्या. पण त्याची कमी सर्वांना जाणवत होतीच. तसं वेळोवेळी त्याची मदत त्या घेत होत्याच. आणि शिक्षकही होते मदतीला.
इकडे रिमझिमशी गप्पा दिवसेंदिवस वाढत चालल्या होत्या. जेव्हा तीचा ‘hi’ मॅसेज आल्यानंतर तिच्याबद्दल तो जाणून घ्यायला उत्सुक झाला.
मित- व्हेअर आर यु फ्राॅम?
त्याने प्रश्न केला
रिमझिम- आसाम. यु??
तिनेही उत्तर दिले. आणि लगेच प्रश्नही केला.
मित- ओह. वाॅव आसाम इज व्हेरी बेस्ट प्लेस यु नो. इज इन नाॅर्थ इस्ट आय थिंक??
त्याने प्रोत्साहीत करण्यासाठी लगेच म्हटले.
रिमझिम- येस. यु आर फ्राॅम?
मित- महाराष्ट्रा
रिमझिम- नाईस.
एवढं बोलून ती ऑफलाईन चालली गेली. पहिल्यांदा ते बोलले म्हणेन मितही जास्त बोलला नाही. दुस-या दिवशी त्याने ‘गुड माॅर्निंग ‘ चा मॅसेज केला. आणि आपल्या कामाला लागला. त्यांचं बोलणं आता रोजच होऊ लागलं. लवकरच ते चांगले मित्र बनले. एकमेकांच्या चांगल्या वाईट सवयी, स्वभाव जाणुन घेऊ लागले. तिलाही त्याच्याशी बोलण्यात दिवसेंदिवस रस वाढत जात होता.
आज मित घरीच होता. आई-बाबा बहीणीच्या घरी गेल्यामुळे आज त्याला दवाखान्यातही जायचं नव्हतं म्हणून दुपारच्या वेळी त्याच्या अभ्यासाच्या टेबलावर तो निवांत बसला होता. Hey तिचा मॅसेज आल्यावर त्यांच्या गप्पा सुरू झाल्या.
मित- आज काॅलेज नही गई
रिमझिम- नही आज छूट्टी है.
मित – ओह. ओके.
रिमझिम- जी.
मित- यार हम इतना दिनो से बाते कर रहे है. और मैने आपका नाम ही नही पूँछा आपका नाम क्या है?
रिमझिम – रिमझिम. लिखा तो है.
मित- अरे एसे नाम के आय डी फेक भी होते है. लडके फेक आय डी बना कर रखते है. इसलिए पूँछा.
रिमझिम- ये तुम लडको की प्रोब्लेम है. इसमे मै क्या कर सकता हूँ . मेरा तो यही नाम है.
आणि हसण्याची इमोजी पाठवली . त्यानेही हसण्याची इमोजी पाठवली.
मित- कोई बात नही. लेकीन नाम बहोत अच्छा है आपका. रिमझिम बरसती सावन की धार पुरे कायनात को ठंडक पहुंचाती हैं और आपकी मुस्कान आँखो को.
त्याचा हा मॅसेज वाचून ती स्मित हसली आणि “शायद” एवढं म्हटली. त्याला वाटलं लाजली असावी.
मित – शायद इसी ठंडक की तलाश मे आँखे बरसों से रिमझिम सी बारिश ढूँढ रही थी. जो आप पर जाकर रूकी.
ये मॅसेजला तीने उत्तर दिले नाही. फक्त स्मित हास्याची एक इमोजी पाठवली. त्याने जास्त वेळ उत्तराची वाट न पाहता वाचनात व्यस्त झाला.
थोडाच वेळ झाला होता. तेव्हा दारावर एक जोराची थाप पडली. “मित दादा, लवकर दार उघड” असा काहीसा घाबरलेल्या आवाजात रोहित दरवाज्यावर दार उघडण्यास सांगत होता. मित उठला आणि दरवाज्याकडे जाऊ लागला. तेवढ्यात रोहितने पुन्हा थाप दिली.
मित- अरू उघडतोय ना. थांबशील की नाही थोडं
मितने दार उघडलं. रोहित घाई-घाईत आत घुसला.
मित- अरे रोहित, एवढ्या कसल्या घाईत आहेस. काय झालं?
मितने त्याला प्रश्न केला.
रोहित – अरे मित दादा. तू ये लवकर तूला एक गोष्ट सांगायचीय. लवकर ये ना……
त्याला कसलाच धीर निघत नव्हता.मित त्याच्या जवळ खुर्चीवर जाऊन बसला.
मित- हं. बोल
रोहित खुप घाबरल्यासारखा होता. पण कुठेतरी हास्यही त्याच्या ओठांवर तरळत होतं
(क्रमशः)
© कपिल साहेबराव इंदवे
मा. मोहीदा त श ता. शहादा, जि. नंदुरबार, मो 9168471113