मराठी साहित्य – कादंबरी ☆ साप्ताहिक स्तम्भ #4 ☆ मित….. (भाग-4) ☆ श्री कपिल साहेबराव इंदवे

श्री कपिल साहेबराव इंदवे 

(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है. आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है. एक युवा लेखक  के रुप  में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते. हमें यह प्रसन्नता है कि श्री कपिल जी ने हमारे आग्रह पर उन्होंने अपना नवीन उपन्यास मित……” हमारे पाठकों के साथ साझा करना स्वीकार किया है। यह उपन्यास वर्तमान इंटरनेट के युग में सोशल मीडिया पर किसी भी अज्ञात व्यक्ति ( स्त्री/पुरुष) से मित्रता के परिणाम को उजागर करती है। अब आप प्रत्येक शनिवार इस उपन्यास की अगली कड़ियाँ पढ़ सकेंगे।) 

इस उपन्यास के सन्दर्भ में श्री कपिल जी के ही शब्दों में – “आजच्या आधुनिक काळात इंटरनेट मुळे जग जवळ आले आहे. अनेक सोशल मिडिया अॅप द्वारे अनोळखी लोकांशी गप्पा करणे, एकमेकांच्या सवयी, संस्कृती आदी जाणून घेणे. यात बुडालेल्या तरूण तरूणींचे याच माध्यमातून प्रेमसंबंध जुळतात. पण कोणी अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून झालेल्या या प्रेमाला किती यश येते. कि दगाफटका होतो. हे सांगणारी ‘मित’ नावाच्या स्वप्नवेड्या मुलाची ही कथा. ‘रिमझिम लवर’ नावाचं ते अकाउंट हे त्याने इंस्टाग्रामवर फोटो पाहिलेल्या मुलीचंच आहे. हे खात्री तर त्याला झाली. पण तिचं खरं नाव काय? ती कुठली? काय करते? यांसारखे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत. त्याची उत्तरं तो जाणून घेण्यासाठी किती उत्साही आहे. हे पुढील भागात……”

☆ साप्ताहिक स्तम्भ #4 ☆ मित….. (भाग-4) ☆

रोहित नेहमीच बेफिकीरीने जगणारा, कोणालाही कसल्याही बाबतीत न जुमाननारा मुलगा आज एवढ्या घाबरलेल्या अवस्थेत पाहून मित चकित होता. तो आपल्या खुर्चीवर येऊन बसला.

मित- हं बोल, काय म्हणतोयस.

रोहित- मित दा, मला भिती वाटतेय. कसं सांगु तेच कळत नाहीये.

मित हसला.

मित – तुला पण भिती वाटते?

मितचं चिडवलेलं रोहितला आवडलं नाही.

रोहित- मजा घेतोयस माझी

मितला आता हसू आवरेना. कसं तरी त्याने स्वतःला आवरले.

मित- अरे मजा नाही घेत. सांग तुला काय म्हणायचंय ते. घाबरू नको.

रोहित – अरे काय झालं सांगू का?

आणि त्याने त्याच्यासोबत घडलेली गोष्ट सांगायला सुरुवात केली.

प्रेम साधारणतः तेरा – चौदा वर्षाचा मुलगा त्याची सकाळची शाळा संपवून सायकलने घरी जात होता. दुपारची वेळ होती. म्हणून बाहेर फारसं कोणी नव्हतं. मुस्कानने त्याला हाक मारून थांबवले. पुजाही तीच्या जवळच होती. दोघीही पळत पळत त्याच्याजवळ आल्या.

मुस्कान- फोन कर त्याला

तीने हाफतच म्हटले. प्रेम तीचं म्हणनं त्याला समजलं. त्याने स्मित करत खिशातून त्याचा साधा फोन काढला. आणि रोहितचा नंबर डायल केला.

रोहित शेतात काम करत होता. त्याचे आई – बाबाही सोबतीला होते.  त्याचा फोन वाजला. त्याने नंबर पाहिला आणि उचलून

रोहित- हं बोल प्रेम.

प्रेम- घे मुस्कान बात करतेय.

मुस्कानचं नाव ऐकताच त्याच्या अंगात थर-थर व्हायला लागले. त्याने तसाच भितीने थरथरत म्हटले-

रोहित- फोन ठेव प्रेम.

शांत वातावरण असल्याने त्याचं बोलणं मुस्कान आणि पुजालाही एकू जात होते.  त्याचं असं बोलणं ऐकून प्रेम आणि मुस्कानही चकित झाले.

प्रेम- का रे ?

रोहित- तू फोन ठेव, मला भिती वाटतेय….

त्याने घाई घाईत फोन बंद केला. आणि हातातलं काम सोडून कुणालाही न सांगता तो चालता झाला. त्याचं असं न सांगता जाणं आईला खटकलं. तिने त्याला रोखले. पण तो थांबला नाही. आई म्हटली

“थांब बेटा ये संध्याकाळी मग दावते तूला”

पण ते ऐकण्यासाठी तो थांबला कुठे होता. आईला शांत करण्यासाठी बाबा म्हटले

“अगं गेला तो जाऊ दे”

आई- हो का. जाऊद्या तर जाऊद्या मग. मला काय ? हे सगळं तुम्हाला एकट्यालाच करायला लावते की नाही ते बघाच”

इकडे त्याचं असं बालिशपणे बोलण्याने मुस्कान, पुजा आणि प्रेम एकमेकांकडे बघून हसले.आणि चालले गेले

रस्ताच्या बाजूला मुस्कानचं घर होतं. रोहित जेव्हा आला. तेव्हा त्याने चोरट्या नजरेने पाहिले. त्या दोघीही ओट्यावरच बसले होते. त्याला पाहून दोघीही हसल्या. रोहितने चालणे अजून जोरात  केले.

त्याने पुर्ण एकून घेतल्यावर मित म्हटला- बरं, मग तुझं काय म्हणणं आहे?

रोहित क्षणभर गोंधळला.

रोहित- म्हणजे. मला काही कळत नाहीये. तू सांग मी काय करू ते.

मित – मी काय सांगणार? बरं फोन कर

रोहित ( पुन्हा गोंधळला) – अरे मित दा. असं नको सांगू ना. मला काहीच कळत नाहीये काय बोलायचं ते.  तू सांग काय बोलू ते

मित- अरे, त्यात घाबरण्यासारखं काय आहे? तीने तुला फोन केला तर काहीतरी बोलण्यासाठीच केला असेल ना. तू फक्त हॅलो म्हण. ती बोलेल पुढे काय बोलायचं ते.

सायंकाळी मित आणि रोहित बाहेर गेले फिरायला. मुस्कानचे घराजवळून जातांना रोहितने मितला म्हटले  ” मित दा, ती आहे बघ” मितने वळून पाहिले आणि स्मित केले. आणि पुढे चालता  झाला. मुस्कान गोंधळली. ती त्याच्या हसण्याला काही वेगळंच समजून गेली.

 

 (क्रमशः)

© कपिल साहेबराव इंदवे

मा. मोहीदा त श ता. शहादा, जि. नंदुरबार, मो  9168471113