सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– पुढे चालत रहाण्यासाठी…– ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆ .
जोवर पायात ताकत आहे
तोवर तु चालत रहा
साथीला कोणी नसेल तर
आपल्याच सावलीकडे पहा
☆
अंधारात गेलास तरीही
सावली साथ सोडत नसते
पायाजवळ येत येत ती
आपल्यातच मुरत असते
☆
उन्हामधे चालता चालता
थकवा येईल भाजतील पाय
तसच चालत रहा सतत
अजिबात थांबायच नाय
☆
परिक्षा घेणार आभाळ मग
आपोआप भरून येईल
चिंब चिंब भिजवून तुला
सारा थकवा घालवून देईल
☆
आता मात्र थांब तू चिंब हो
हात पसरून स्वागत कर
मिठी मारून कवेत घे
पुढ चालत रहाण्यासाठी
पाऊस सारा मुरवून घे
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈