सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– फुल देखणे…–
☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
फुल देखणे मला न भुलवी
गंधित परिमल ना बोलावी
हवा मज मकरंद आतला
चोच माझी अलगद मिळवी
☆
एक थेंब त्या मधुस्वादाने
खरी तृप्तता मनास मिळते
नाजुक सुमनातुन मध घेणे
निसर्गत: मज वरदानच ते
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈