सुश्री उषा जनार्दन ढगे
चित्रकाव्य
☆ – प्रश्न- ??
☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆
तो प्रश्न अनुत्तरीत राहिला..
विचारला..तरी क्लृप्तीने टाळला…
चकविला जरी, मनांतच राहूनी गेला…
क्षणभर काहूर माजवूनी गेला…
का प्रश्न तो ऐकूच नाही गेला..?
अन् फिरून प्रश्नजाळ्यांंत गुंंतवूनी गेला..?
एक भला प्रश्न मागेच सोडूनी गेला…
प्रश्नचिन्ह बनूनी मग वेंगाडित राहिला…!
अन् मग प्रश्नाच्याच त्या,
संदिग्ध कोशपटलाला…
प्रत्युत्तराचा तो तीक्ष्ण तीर
आरपार छेदूनी गेला…!
चित्र साभार – सुश्री उषा जनार्दन ढगे
© सुश्री उषा जनार्दन ढगे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈