सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– सोनेरी तारा… – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
गच्च काळोखाची रात
तारा सोनेरी प्रकाशला
माणकांचा इवला तुरा
त्यास कोणी जडविला ….
☆
तारा चमचम करी
काळ्या पार्श्वभूमीवरी
मोतियाची ही आरास
शोभतसे तयावरी ….
☆
तारा आकाशात उगवला
सुवर्ण झळाळी अंधाराला
दुधाळ चांदणे नित्य पसरते
आजची रजनी गुरूपुष्याला ….
☆
गुरूपुष्य नक्षत्र आभाळाला
दान मिळाले कुठून आजला
निशाराणीच्या तमशालीवर
सोनेरी तारा जडला गेला ….
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈