सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – सलाम – कष्टाला अन जिद्दीलाही… – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

शरिरावर दिसताहेत

कष्टाच्या खाणाखुणा

रानावनात काम करतो

कसं म्हणावं म्हातारपणा !

होडी घेऊन जंगलात जाई

अडचणीतून वल्हवत नेई

वल्हवायाला जोर लागतो

सवयीने तो आपसूक  येई ।

हिंडून  हिंडून  फळे गोळा

घरातल्यांना घालायाला

जिद्द  तरुणाची घेउनच

करतो सारी हिंमत  गोळा ।

तरूणाला लाजवेल 

असं काम जो करतो

दिसायला म्हातारा जरी

तरूणाईचे काम करतो ।

त्याच्या कष्टाला सलाम

वयाच्या जिद्दीला सलाम 

निसर्गाचे सानिध्य मिळत

थकलेपणा गेला दूर लांब ।

दया याची येत नाही

कौतुक  मात्र  वाटत राही

कष्ट करून जगणारा हा

निसर्गात एकरूप होई ।

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments