श्री रवींद्र सोनावणी

?️?  चित्रकाव्य  ?️?

(१२ अक्टूबर १९२२ – ६ जून २००२)

?– हे चैत्र यामिनी… – ? ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

(१२ ऑक्टोबर … ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवयित्री श्रीमती शांता शेळके यांचा जन्मदिन– … त्यांना भावपूर्ण आदरांजली🙏) 

शांत निरागस प्रसन्न मुद्रा 

विद्वत्तेचे तेज मनोहर

अस्सल मराठमोळी महिला

नीट नेटका पदर डोईवर ||१||

 

प्रशांत मानस सरोवरामधि

सुविचारांची फुलली कमळे

नादमधुर कविता गाण्यांनी

कुशीत तुमच्या जन्म घेतले ||२||

 

महाराष्ट्राच्या शेतमळ्यांतून

पिकविलेत शब्दांचे मोती

तुम्हा कारणे गंधित झाली

वनराईची काळी माती ||३||

 

साधी भोळी हळवी यामिनी

परंतु तेजस्विनी होती

शांता नावामध्ये कणखर

अभिमानाची ठिणगी होती ||४||

 

दरी खोऱ्यातून आमराईतून

घुमती तव कवितापंक्ती

घरांघरांतून नित्य तेवतील

शब्दांच्या मंगल ज्योती ||५||

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments