सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
☆ फुल किती सुंदर…
☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
जेवढ आयुष्य आहे तेवढ
फुल किती सुंदर जगत
नितळ सौंदर्य दरवळ आपला
मुक्तपणे उधळत रहात
☆
झाडावरच्या कळ्यांना
कस जगाव शिकवण देत
अस आखिव रेखीव जगा
आपणालाही संदेश देत
☆
जगण्याची ही श्रीमंती
किती काळ नको विचार
आनंद द्या समाधान घ्या
तसाच असो वर्तन, आचार
☆
चित्र साभार – सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈