सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
☆ गुलमोहर… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
झळा उन्हाच्या झेलून मुरवत
गुलमोहोर अंगोपांगी फुलतो
कष्टकऱ्यांची दु:खे जणू तो
देहावरती फुलवीत रहातो
☆
ज्वालेसम ही फुले भासती
झाडाखाली शांत सावली
थकल्या भागल्या जीवांसाठी
छाया याची माय माऊली
☆
🌳 दिवसभराच्या शुभेच्छा 🥦
चित्र साभार – सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈