सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
☆ मित्र होऊया निसर्गाचे … ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
पर्यावरणाचा समतोल हवा
तर रोजचा दिन त्याचा हवा
समतोल हवा माती पाण्याचा
जागृत सर्वानीच रहाण्याचा
*
पाणी वापर जल साठवण
वृक्ष कत्तलीवरती नियंत्रण
जे जे करती वृक्षारोपण
त्यांनीच करावे की संगोपन
*
आज कितीतरी रोपं लावती
सुकती किती पण नसते गणती
मीडियावरती फोटो झळकती
मागे केवळ खड्डेच उरती
*
म्हणून घेऊया रोज काळजी
पाणी ,माती अन झाडे जपू
मित्र होऊया निसर्गाचे आता
दूर ठेवुया प्ल्यास्टिकासम रिपू
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈