सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ जायचेच जर न येण्यासाठी… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

पुन्हा परत ना इथे यायचे

ठरवूनच ती निघून गेली

ती येण्याची वाट परंतू

इथे वाट पहात थांबली

*

 त्या वाटेवर तिच्याचसाठी

 मऊ रेशमी हिरवाई आली

 अन् वाटेच्या अगदी मध्ये

 झाड उभे विश्रांतीसाठी

*

 येणार जर नव्हती तु तर

 वाट कशाला आखीव मागे

 पाहणारा गुंततो  आपसूक

 आठवणींचे उलगडून धागे

*

  जायचेच जर न येण्यासाठी

  काहीही  ठेवावे  ना  पाठी

  खाणाखुणा नष्ट कराव्या

  हवे ते जपती काळीजकाठी

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments