सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
☆ असाच रहा बरसता… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के☆
☆ आकाशाकडे पाहून
मी हात जोडते आता
या वर्षा काळामध्ये
असाच रहा बरसता
*
तु बरसण्या नेहमी
गणित ठरलेले असते
तु तसेच रहा नीत्य
नाहीतर सारे बिघडते
*
झाडांची कत्तल झाली
डोंगरही सपाट केले
काहींच्या स्वार्थापोटी
पर्यावरण बिघडू गेले
*
तुझा बिघडण्या ताल
हे खरेच सारे ठरले
कुणब्याचे जीवन सारे
अनिश्चतेने भरून गेले
*
दिनरात राबतो कुणबी
उघड्यावर करी चाकरी
तव नियमित येण्यानेच
मिळते तयास भाकरी
*
शेतकरी कष्टतो म्हणूनी
सर्व जगताचे भरते पोट
भूक लागते जगण्याला
काय करेल केवळ नोट
*
पंचतत्वे शरिर बनलेले
पंचतत्वे चराचर चाले
पाच तत्वा जोडूनी हात
म्हणू जोडून राहू सगळे
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈