श्री सुहास सोहोनी
चित्रकाव्य
– ना निगराणी,नाही पाणी – ☆ श्री सुहास सोहोनी / सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
ना निगराणी नाही पाणी …
ना माळ्याची जाग …
खडकांमधुनी बहरुन आली …
ही देवाची बाग … !
☆
© श्री सुहास सोहोनी
सुश्री नीलांबरी शिर्के
☆
विशाल शिळा जवळी जवळी
नाजुक हळवी मधेच वाट
दूर पणा हा जवळ करावा
विचार करी शंभरशे साठ
☆
हळूवारपणाने वाटेने मग
फुलबीज रूजविले स्वतःत
हळवी नाजूक सुमने फुलली
दोन शिळांच्या मध्यात
☆
नाजुक गंधित फुलस्पर्शाने
आपसूक सांधली दोन मने
जरा न हलता जवळीक साधली
हिरव्या नाजूक सृजनाने
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
चित्र – अनामिक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈