श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
– वास्तवरंग… – ☆ श्री आशिष बिवलकर ☆
☆
✍🏻
तोच. कचरा,
कुंडी नवीन!
तोच गोंधळ,
घालणारे. नवीन!
तिची खुर्ची,
उबवणारे नवीन!
तीच दारू!
बाटली. नवीन!
तीच. जनता,
पिळणारे नवीन!
तोच. चिखल,
उडवणारे नवीन!
तीच. ढोलकी,
वाजवणारे. नवीन!
तोच. मीडिया,
चालवणारे. नवीन!
तोच मार्ग,
चालणारे. नवीन!
तीच. तिजोरी,
लुटणारे नवीन!
त्याच पंक्ती,
गाणारे नवीन!
तेच. भाषण,
देणारे. नवीन!
तिचा महागाई,
करणारे नवीन!
तोच. खेळ,
डोंबारी नवीन!
तोच तमाशा,
तमासगीर नवीन!
तोच. मुजरा,
करणारे नवीन!
तोच. बाजार,
मांडणारे. नवीन!
तोच. आक्रोश,
ऐकणारे नवीन!
तोच. छळ,
छळणारे. नवीन!
तीच. वृत्ती,
निभावणारे नवीन!
तोच वधस्तंभ,
रक्त पिणारे नवीन!
तोच. फंदा,
जल्लाद नवीन!
तेच.. तेच.. तेच.. तेच.. हाल,
सोसणारे नसती येथे नवीन
☆
(चित्र – Old cartoon by RK Laxman – साभार श्री आशिष बिवलकर)
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈