श्री सुहास रघुनाथ पंडित
चित्रकाव्य
– निसर्ग… – ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
☆
डोळे उघडून बघा जरा
निसर्ग काय सांगतो आहे
लहान मोठ्या गोष्टीतून
खूप काही शिकवतो आहे.
☆
हात पाय खुशाल तोडा
सोलून काढा कणाही
मूळ,माती यांचे नाते
विसरू नका जराही.
☆
मारणा-याने मारत जावे
झेलणा-याने झेलत जावे
तोडणा-याने तोडत जावे
फुलणा-याने फुलत जावे.
☆
चित्र साभार – सुहास रघुनाथ पंडित
© सुहास रघुनाथ पंडित
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈