सुश्री नीलांबरी शिर्के
☆ जीवो जीवस्य जीवनम्… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
तडफड झाली बंद क्षणात
चोचीमधला होता घास
पकड एवढी घट्ट आपसूक
जीव जाई गुदमरून श्वास —
*
दोघांचे डोळे जवळजवळ
भक्ष्याचा आनंद एका नेत्री
भयभीत भाव दुज्या डोळी
मरणच या क्षणाची खात्री —
*
जीवो जीवस्य जीवनम्
इथे तिथे निसर्गात चाले
मान्य असते आपणा परंतु
होतातच ना डोळे ओले! —
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈