श्री अनिल वामोरकर
चित्रकाव्य
स्वर्णीम पहाट… ☆ श्री अनिल वामोरकर ☆
☆
चैतन्य चराचरी
झाली सोनेरी पहाट
तम गेले लया
सुवर्ण फुले फुलली…
साधन नीत ज्याचे
अंतरीचा भानू उदेला
सत्कर्म नीत ज्याचे
सुवर्ण फुले फुलली..
सदगुरुमय हृदय ज्याचे
तमाची रात्र संपलीच
संपलीच चिंता, आता
सुवर्ण फुले फुलली…
मन प्रसन्न ज्याचे
वाणीतही गोडवा
गुरुसेवा हेचि कर्म
सुवर्ण फुले फुलली…
☆
© श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈