चित्रकाव्य
☆ चित्रातून कशीबशी बाहेर आली मोनालिसा? ☆ सुश्री निलिमा ताटके ☆
☆
चित्रातून कशीबशी बाहेर आली मोनालिसा.
लपून, हळूच घेते आजूबाजूचा कानोसा.
☆
फार कंटाळली होती, एके ठिकाणी बसून.
जाम वैतागली होती खोटं खोटं हसून.
☆
कडक चहा हवा बुआ ! हा आळस घालवायला.
चहाबरोबर चालेल मला काही तोंडांत टाकायला.
☆
करा तयारी चहा-नाश्त्याची, मी पटकन् अंघोळ करुन येते.
फ्रेश फ्रेश होते, नि पुन्हा प्रसन्नशी हसते.
☆
माझे हसू, लोकं होतील परत फिदा.
जगा वेड लावीन मी नव्याने पुन्हा.
☆
छायाचित्र – सुश्री निलिमा ताटके.
© निलिमा ताटके
23.8.2022.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈