सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– विटेवरती हरित शहारे – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
फरशीखाली माती दबली
माती नाही माता गाडली
कट्ट्यावरती उघडी रहाता
त्या मातीवर विट ठेवली
☆
थोडी तिजला मिळता जागा
बीज अंकुरून येई वरती
सजीवांच्या कल्याणास्तव
सृजनशील ही झटते धरती
☆
इवले इवले सृजन पाहुनी
विटेवरती हरित शहारे
विट मनाशी हसून म्हणते
या सृजनाने मीही सजले
☆
चित्र साभार –सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈