सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– किनारा शोधत राही – 🚤⛵ ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
अथांग सागर भवताली
आकाशाची जली निळाई
दिशा द्यायला नाही वल्हे
नाव एकटी टिकून राही
☆
बोलवी का कुणी किनारा?
शाश्वत सहारा नीत देणारा
त्याच किनार्याच्या विश्वावर
मिठीत घेईल पुर्ण सागरा
☆
सागराची निळी नवलाई
भूल पाडत हाकारत जाई
भरकटण्याचे भय होडीला
म्हणून किनारा शोधत राही
☆
किनारा मिळे बंधन येते
बंधन विश्वहर्तता देते
प्रेमरज्जू साथीला मिळता
होडी सागरी खुशाल फिरते
☆
चित्र साभार –सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈