श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ जीवनरंग ☆ माणूसकीची हार ..अनुवादित कथा.. ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆
चौधरी सगळ्यांना मदत करायचे, हे सगळ्या कॉलनीत माहीत होतं. मानवता, सत्य, ईमानदारी यांची ते जणू प्रतिमूर्तीच होते. त्यांचं घर कोपर्यावर होतं. घर दोन्ही बाजूंनी उघडायचं. घराला दोन दरवाजे होते. मागचा दरवाजा आणि एक खिडकी कायम बंद असायची.
ते सुट्टीचे दिवस होते. त्यांची पत्नी मुलांना घेऊन माहेरी गेली होती. सकाळी सकाळी चौधरी म्हशीचं दूध काढून घरात शिरणार, एवढ्यात एक तरुण तिथे धावत धावत आला आणि म्हणाला, `भाऊसाहेब मला वाचवा. माझ्यामागे चार गुंड लागलेत. मी हात जोडतो. आपले उपकार मी कधीच विसरणार नाही. कृपया मला कुठे तरी लपवून ठेवा.’
`आपण कोण? कुठून आलात? प्रकरण काय आहे? ‘
तरुण म्हणाला. मी ड्रायव्हर आहे. त्यांची गाडी एकदम मधे आली. थोडासा अॅक्सिडेंट झाला.! बस!’ चौधरींची माणुसकी उफाळून आली. त्यांनी मागे-पुढे काही बघितलं नाही. त्याला घरात लपून बसायला सांगितलं आणि स्वत: दरवाजात उभे राहिले.
थोड्याच वेळात चार गुंड धावत आले. त्यांनी चौधरींना विचारलं, `कुणी तरुण इथे धावत आला होता का? ‘
चौधरी म्हणाले, `इथे कुणीच आलं नाही. सकाळपासून मी इथेच बसलोय. काय झालं?’ तो माणूस अॅक्सिडेंट करून इथे पळून आलाय. ‘ चौधरींनी माणुसकीची बाजू घेत त्यांना समजावण्याचा बराच वेळ प्रयत्न केला. `याचे परिणाम वाईट होतील.’ चारी गुंड त्यांना ताकीद देऊन हसत हसत पुढे गेले.
चौधरींनी कुलुप उघडलं आणि ते आत गेले. बघतात तो काय? गोदरेजचे कपाट, पेट्या सगळ्यांनी कुलुपे तोडलेली होती. कपडे पसरलेले होते. दागिने, रोख रक्कम गायब झालेली होती. मागचा दरवाजा उघडलेला होता. त्यांनी आपलं डोकं बडवून घेत म्हंटल, `हा माणुसकी दाखवल्याचा परिणाम. काय करणार? ते पाचही जण एकमेकांना मिळालेले होते. त्यांच्या योजनेपुढे माझी माणुसकी हरली.
मूळ कथा – इंसानियत हार गई मूळ लेखक – शिवचरण सेन शिवा
अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
सावध करणारी कथा.??