श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
☆ जीवनरंग ☆ कृतज्ञ डोळे – भाग-2 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
“सायंकाळी मी बेलसानी गावात शुषमाच्या घराचा पत्ता विचारत जावून पोचलो .आवाज देताच सुष्माने दार उघडले ती माझी वाट पहात होती हे जाणवले. खाट टाकून त्यावर चादर टाकत ती बसा सर असेम्हणत आत वडिलांना बोलव्यायला गेली ,तिचे आई वडील दोघेही बाहेर आले नमस्कार सर म्हणत जवळ येऊन उभे राहिले तेव्हड्यात पाण्याचा ग्लास घेऊन सुषमा आली.मी सुरुवात कुठून करावी या विचारात असतानाच ,तिचे वडील बोलायला लागले,बरे झाले सर तुम्ही आले ही पोरगी ऐकतच नाही जी शिकतोच म्हणते का करावं जी समजतं नाही गुरुजी.मी त्याला उलट विचारले ती शिकतो म्हणते तर शिकू द्या न अभ्यासात हुशार आहे ती. एक गंभीर उसासा टाकून नामदेव बोलायला लागला सर तुम्हाला आमची परिस्थिती नाही समजायची गुरुजी.ही पोरगी एका डोळ्याने आंधळी आहे .लहानपणी विटू दांडा खेळताना विटी इच्या डोळ्याला येवून लागली. गावच्या वैदान पानाचा रस टाकला डोयात डोळा पुरा पांढरा झाला सर टिक पडल्या वानि . आता मी गडी माणूस दुसऱ्याच्या शेतावर काम करणारा .इच्यासंग कोण लगीन करणार सर कोणी गडी माणूसच ना जी,जास्त शिकली तर कोण करण लगण भोकण्या पोरिसंग सांगाजी तुम्हीच काय करावं आम्ही. आता खरी समस्या माझ्या लक्षात आली होती.चहाचा कप हातात देत सुषमा अधिरपणे माझ्याकडे पहात होती.
मी चहाचे घोट घेत विचार करू लागलो कुठून सुरुवात करावी.मला त्यांची अगतिकता कळत होती पण सुषमाचे शिक्षण सुटु नये यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होत. सुषमाच्या आईच्या आवाजाने मी भानावर आलो ,गुरुजी शिकवाची इच्छा आहे जी आमची पण हीच्या डोळ्याचा प्रश्न आहे जी.दोन भाऊ लहान आहे त्याईच भी पहा लागणं नाजी. उद्या जास्त शिकणं त पोरगा भी जास्त शिकलेला लागणं जी कोणी मास्तर करण काजी मह्या पोरीसंग लगीन. मी विचारात पडलो. आव्हनडा गिळून मी बोलायला सुरवात केली मला वाटते तुम्ही तीच शिक्षण बंद न करता तिला पायावर उभी करावी म्हणजे ती तुमच्यावर भार होणार नाही. सुषमा दारा मागून माझ्याकडे पाहत होती.तिची माझ्याकडून अधिक अपेक्षा असावी हे मला जाणवत होते, पण अधिक काय बोलावे हे सुचेना .विचार करून विचारले शुषमाचा हा डोळा चांगला असता तर तुम्ही तिला शिकविले असते काय . नक्कीच….. दोघेही एका सूरात बोलले .मला एक दिशा मिळाल्यासारखे वाटले. सुषमाला खुणेनेच सांगितले चिंता करू नको करतो काही तरी.निरोप घेऊन निघालो.नामदेव कार पर्यंत पोहचवायला आला, म्हणाला सर पोरीसाठी करा काहीतरी, मी मान हलवून निघालो, घरी अलोतरी मन कुठे लागेना, सुषमाचे डोळे पुन्हा पुन्हा समोर येत होते. त्याच वर्षी मी जेसिज या सामाजिक संस्थेचाही अध्यक्ष होतो. एक नेत्रशस्त्रकिया शिबीर घेणार होतो वर्धेचे सुप्रसिद्ध नेत्र चिकित्सक डॉक्टर अधलखिया येणार होते. चेन्नयी ची अँपास्वामी कंपनी लेन्स प्रायोजित करणार होती.नकळत मी डॉक्टरांना फोन लावला सुषमाची केस सांगितली डॉक्टर म्हणाले प्रत्यक्षात पाहिल्यावरच सांगता येईल जर कार्निया सुरक्षित असेल तर बरेच काही करता येईल, मला एक आशेचा किरण सापडला.मनाशी खूणगाठ बांधून दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेलो सुषमा आली नव्हती.पुढे आठवडा भर आलीच नाही.मीच गेलो तिचा गावाला ठरवून टाकले शिक्षणाचे बोलायचे नाही.अपेक्षेप्रमाणे माझे थंड स्वागत झाले पाहून न पहात केल्यासारखे करून तिची आई म्हणाली गुरुजी येत नाही जी आतासुषमा कॉलेजात, तुम्ही त्यायाले काही मनू नका.
क्रमशः भाग – 3….
© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर, मो. 9822363911
≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈