श्रीमती उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ रियुनियन .. भाग 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆
लंडनच्या इस्ट एंड ला केबल स्ट्रीट वर असलेले ते शंभरी पार केलेले रेस्टोरेन्ट कम बार. नाव होते ‘पॉल्ज लाउंज’. तसा हा लंडनचा लो-मार्केट असलेला भाग. जास्त करून लंडनचा कामगार वर्ग व मध्यम वर्ग यांनी व्यापलेला. तिथे हे रेस्टॉरंट गेली ११० वर्षे अव्याहतपणे चालू कसे राहिले हेच खरेतर आश्चर्य होते.
साहजिकच होते. इस्ट एंडचे बहुतेक सारे जुने पब, बार व रेस्टॉरंट जाउन आता त्यांच्या जागा केएफसी, मँकडोनल्ड्स, पिझ्झा एक्सप्रेस, स्टारबक्स यासारख्या विदेशी मल्टीनैशनल कंपन्यांच्या आउटलेट्सनी घेतली होती. हे रेस्टॉरंट मात्र शतक पूर्तीनंतरही अद्याप टिकून होते.
आज या रेस्टॉरंट चे एक टेबल दुपारच्या बारा वाजता रिझर्व होते. ते ज्यांच्यासाठी आरक्षित होते ते एकेकजण बाराच्या आसपास येउ लागणार होते.
रिचर्ड टैक्सी मधून आला. एका हातात एक मोठी कैरी बैग व दुस-या हातात काठी टेकत तो रेस्टॉरंट मधे शिरला. रेस्टॉरंट चा हेड वेटरने समोर येउन त्यांचे स्वागत केले.
त्याने आदराने रिचर्डला विचारले.
‘माफ करा…आपण 65 इयर्स रियुनीयन साठी आले आहात का?’
‘होय..अगदी बरोबर. माझे मित्र आधीच आलेत का?’ त्याने उत्सुकतेने विचारले.
क्रमशः….
© श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈