श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ जीवनरंग ☆ पुढचं पाऊल ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
“दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त ज्या आमदार-खासदारांना शिक्षा झाली असेल, त्यांचं विधानसभा वा संसदेतील सदस्यत्व आपोआप रद्द होईल.” सुप्रीम कोर्टाने जाहीर केले
“राजकारणातील अपराध्यांचं वर्चस्व कमी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने हे चांगले पाऊल आहे.” एक कार्यकर्ता दुसर्यायाला म्हणाला.
“हा निर्णय राजकीय पक्षांनी मानला तर ना! उमेदवारांना तिकीट देण्याची वेळ आली की ते म्हणणार, जिंकणार्या उमेदवारालाच तिकीट देण्याचा विचार केला जाईल.”
“हां! हेही खरं आहे.”
“असं कळतं, कोणत्याच गोष्टीबाबत एकमत न होणारे सर्व राजकीय एकत्र येऊन त्यांनी बैठक घेऊन निर्णय घेतलाय की याच सत्रात सरकार सुप्रीम कोर्टाचा आदेश निष्प्रभ बनवण्यासाठी संशोधन विधेयक मांडणार आहे. त्या विधेयकाचं सर्वच राजकीय पक्षांनी समर्थन करावं. राजकीय पक्ष गुन्हेगारांच्या पकडीत आहे आणि संसद राजकीय पक्षांच्या. त्यामुळे संशोधन विधेयक पारीत होणारच!”
“तर मग संसदेच्या पुढल्या सत्रात संसद आणि विधानसभेत अपराध्यांसठी काही सीटचं आरक्षण असावं, असंही विधेयक मांडलं जाईल.” दोघांचं बोलणं ऐकणारा सामान्य माणूस म्हणाला.
मूळ कथा – अगला कदम मूळ लेखक – श्री अतुल मोहन प्रसाद
भावानुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
नेमक्या शब्दांत परखड भाष्य.