श्रीमती उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ उपाय… (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
‘शुक्रा… खरच तू भेटशील अशी आशा नव्हती. पण पायर्याह उतरताना चान्स घेतला. दोन्ही लिफ्टस बंद आहेत., माहीत आहे नं? असं म्हणत म्हणत हीनाने आत प्रवेश केला.
हो ना ग! काय करणार, आजच नेमकं पूर्वीलाही उशिरा यायचं होतं.’
पूर्वी…?
‘माझ्याकडची कामवाली ग! आतमध्ये झाडू-फारशी करतेय. बोल! तुझी लीव्ह इन रिलेशनशीप काय म्हणतेय?
‘ठीक चालू आहे पण शेवटी गडबड झालीच! यार, त्याचसाठीच आलेय. ते म्हणतात नं, आगीजवळ तूप ठेवलं की कधी ना कधी वितळतच! तू म्हणाली होतीस नं, तुझ्या आजीला अनेक रोगांवरचे अनेक घरगुती उपाय माहीत आहेत.’
‘हो. माहीत आहेत. क्रॉनिक सर्दीसाठी सांगितलेला तो ओव्याचा उपाय… तूही तो करून बघितला आहेस.’
हो. म्हणूनच तर इथे आले. या संकटातून सुटका करून घेण्यासाठी. जरा विचार नं तिला काही घरगुती उपाय….’ हीनाने आपल्या पोटाकडे इशारा करत म्हंटलं .
‘मला मारून टाकणार की काय? आजीला माझीच शंका येईल. इथे येऊन कातडं सोलेल माझं.’
‘मग मलाच फोन नं. दे. मीच बोलेन तिच्याशी.’
‘नाही नाही. तसंही नाही चालणार! आजीला माहीत आहे, तू माझी मैत्रीण आहेस. ती विचार करेल, माझाच काही तरी गोंधळ आहे आणि मला ओरडा खावा लागू नये म्हणून मी तुला पुढे केलय. कधी तरी संधी बघून मीच तिला विचारेन.’
‘जरा लवकर बघ यार…. बस, एकदा सुटका मिळावी. आच्छा मी चालते. अजून तीन जीने उतरायचे आहेत. ‘ असं म्हणत म्हणत हीना बाहेर पडली.
‘पूर्वी, जरा लवकर लवकर हात चालव. मला उशीर होतोय. आज आणि जीने उतरून खाली जायचय.’ शुक्रा म्हणाली.
‘झालं दीदी निघतेच आहे. आपण ही चिठ्ठी तेवढी बघा. ‘
‘अग, कसली चिठ्ठी आहे?
‘हा उपाय आहे. माफ करा. हीना दीदीचं बोलणं मी ऐकलं.’
‘तुला कसा माहीत हा उपाय?’ चकित होत शुक्राने विचारले. तिने चिठ्ठी बघितली होती.
‘दोन वेळा त्याचा वापर मी करून बघितलाय. गॅरेंटेड आहे.’
‘पूर्वी… तू?….’
‘दीदी एकदा रस्त्यावर भीक मागताना पकडले होते. तेव्हा पोलिसांनी मला ‘शेल्टर होम’ मध्ये टाकून दिले. तिथे रोजच कुणा ना कुणाबरोबर तरी जावं लागायचं. हा उपाय सुभाषिताप्रमाणे तिथल्या भिंतीवर लिहिलेला आहे.’ असं बोलता बोलता पूर्वीनं फ्लॅटचा दरवाजा खेचला आणि ती जिन्याकडे गेली.
मूळ हिंदी कथा – ‘नुसखा’ मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’
अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈