सौ अंजली दिलीप गोखले
जीवनरंग
☆ प्रतिकृती… – भाग 2 ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆
(कथा – प्रतिकृती – विज्ञान कथा या विज्ञान कथेला अखिल भारतीय विज्ञान कथा स्पर्धे मध्ये पारितोषिकाने सन्मानीत केले आहे.)
तासामध्ये सहा उमेदवार झाले .
पण तिच्या मनासारखा काही येईना.कोणाला फर्स्टक्लास आहे पण आपल्याच विषयातले नॉलेज नाही. ज्याला नॉलेज आहे तो किंवा ती इंग्रजीमध्ये एक्सप्लेन करू शकत नाही. एक बोलली छान. पण तिला क्लास नाही.आपल्याला एकही चांगला असिस्टंट मिळू नये का? सुखदा मनात थोडी खट्टू झाली.
नेक्स्ट …म्हणताच” मे आय कम इन मॅडम?”सुखदाने नाव वाचले. जॉन राईट.अरे, एखाद्या क्रिकेटियर सारखेच नाव आहे की. आणि हा आपल्या भारतात?जॉन राईट? सुखदाने मान वर केली आणि आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसून तिच्या हातातले पेन खाली पडले. अगदी वीस वर्षापूर्वीचा सुहास! त्याच्याकडे पाहतच राहिली सुखदा. एवढी सेम टू सेम पर्सनॅलिटी असू शकते? कसं शक्य आहे हे? सुहास न आपल्याला फसवलं?छे छे ते तर अशक्यच. मग काय पाहतोय आपण हे?
“मॅडम मेआय कम इन प्लीज?” या प्रश्नाने सुखदा भानावर आली .” ओ … यस.. कम इन .. सीट डाऊन”
थँक्यू मॅडम.
त्याच्या चेहऱ्यावरून सुखदा ची नजर हटतच नव्हती .जॉन राइट सुहास सारखा कसा?.सुखदा ला काही समजेना. मॅडम, ही माझी सर्टिफिकेट्स!
आपल्या हातातील प्लॅस्टिक कव्हर ची फाईल पुढे करून जॉन बोलला .सुख दाआणखीनच दचकली .हा किती सहज मराठी बोलतोय .
“मॅडम एनी प्रॉब्लेम?” माझा बायोडाटा पाहताय ना?”जॉन सुखदा ला विचारत होता.पाठोपाठ आश्चर्याचे जबरदस्त धक्के बसल्याने तिला काही सुचत नव्हते.
ठीक आहे .याची माहिती तर काढू .असा विचार करून एकदा त्याचे निरीक्षण करत करत त्याचा बायोडाटा पाहू लागली . नाव – जॉन . एस . राईट .मधले sअक्षरसुखदा च्या नजरेत चांगल च झोंबल . आईचे नाव :डॉक्टर सूझी राईट .
वडिलांचं नाव – – – ( डॅश ? ) .जन्मस्थळ पॉंडेचरी .
ओ S पाँडेचेरी? सुहास त्याच्या डॉक्टरच्या पेपर प्रेझेंटेशन साठी गेला होता ना पाँडेचरीला ?नेमकी ती वर्ष कशी जुळत आहेत ?काय बरं प्रकार आहे ?
जॉन चं -शिक्षण त्याचं बोलणं इतकं इंप्रेसिव्ह होतं की त्याला सिलेक्ट न करण्याचं काही कारणच नव्हतं .पण याच्या दिसण्याचा काय प्रकार आहे ?बोलतो ही किती सुहास सारखं? त्याच्या जन्माचे रहस्य कसं काय शोधून काढायचं?
“मिस्टर जॉन तुम्ही पॉंडेचरी चे ना! इतक्या लांब महाराष्ट्रात कसं काय येणार? मराठी कसं काय बोलता?”
“मॅडम मला लहानपणापासून महाराष्ट्राची खूप ओढ आहे . वेड आहे . माझी आवड बघून मॉ – मनच मला कॉम्प्युटर वरून मराठी शिकण्याची संधी दिली .शिकताना मला विशेष प्रॉब्लेम नाही आला .माझी मॉम तिथल्या हॉस्पिटल मध्ये डॉक्टर आहे .”
“रियली? तुझ्या माॅमला मला भेटायलाच पाहिजे. तिचा , अॅडरेस, फोन नंबर , ई मेल ऍड्रेस देणार का ? “सुखदाने लगेच धागा पकडला आणि त्याच्याकडून लिहूनही घेतला.
पुढच्या मुलाखती तिन गुंडाळल्याच.
पटकन आपल्या कॉम्प्युटर पुढे येऊन इंटरनेटवरून ॲड्रेस शोधून काढला .लेटर टाईप केले .”जॉनला जॉब मिळत आहे . पण त्याच्या वडिलांचं नाव, पत्ता, ते काय करतात कळ ले तर बरे होईल .”
पण छे ‘ ! इतका अवघड प्रश्न असा चुटकी सारखा कसा सुटेल ?तिकडून उत्तर आले,” सॉरी . ते नाव गुप्त ठेवायचे आहे . सांगू शकत नाही .”
क्रमशः…
© सौ अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈