सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ तुझ्यासारखा तूच… – सुश्री मीरा जैन ☆ (भावानुवाद) सौ. उज्ज्वला केळकर ☆
सुश्री मीरा जैन
समीता आणि सुमीरच्या प्रेमाला ळूहळू रंग चढू लागला होता. आपली प्रेमभावना त्यांनी एकमेकांना बोलून दाखवली होती, असं काही नाही, पण त्या दोघांनाही आतून ते जाणवलं होतं. येत्या व्हॅलेंटाईनच्या दिवसाची खूप स्वप्ने रंगवली होती समीताने. या दिवशी तो आपल्या प्रेमाचा उच्चार करेल, आपल्याला मागणी घालेल, याबद्दल खात्रीच होती तिला. ती सारखी व्हॉट्स् अॅरप हातात घेऊन बसली होती. सुमीरच्या आमंत्रणाची वाट बघत होती. पण संध्याकाळ सरत आली, तरी कुठलाही मेसेज नव्हता. इच्छा असूनही ती स्वत: पुढाकार घेऊ शकत नव्हती. यापूर्वी ते एकटे असे कधीच कुठे भेटले नव्हते.
व्हॅलेंटाईनचा दिवस सरला. व्हॉट्स् अॅीपवर हाय-हॅलो वगैरे काही झालं नाही. समीता साशंक होऊन बसली होती. `आपल्याला उगीचच वाटतय, त्याचं आपल्यावर प्रेम असावं. पण तसं नसणार, नाही तर काल त्याने मला भेटायला बोलावलंच असतं. पण नाही… नक्कीच त्याचं दुसर्यात कुणावर तरी प्रेम असणार. आजपासून त्याचं आणि आपलं नातं संपलं.’ तिला वाटत राहीलं.
रात्री काहीसा उशिराच सुमीरचा व्हॉट्स् अॅ्पवर मेसेज आला. काहीशा उदासपणेच तिने तो वाचला. मेसेज वाचताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मेसेज होता, `खूप इच्छा होती तुला भेटायची. मी माझ्या मनाला कसे काबूत ठेवले, ते माझे मला माहीत. जाणून-बुजूनच भेटलो नाही. तुझ्या- माझ्या विवाहात येणार्यात आडचणी आ वासून समोर उभ्या राहिल्या. वेगळे धर्म, आर्थिक स्थितील केवढी तरी तफावत या सगळ्यामुळे आपला विवाह नाही होऊ शकला तर? मला वाटलं, निंदा-नालस्तीचा एकही डाग तुझं चारित्र्य कलंकित करू नये.’
सुमीताने, धर्म, आर्थिक स्तर भिन्न असतानाही सुमीरलाच जीवनसाथी म्हणून निवडले. कारण इतका पवित्र विचार दुसर्याआ कुणी क्वचितच केला असता.
मूळ हिन्दी कथा – ऩजरिया प्रेम का – मूळ लेखिका – सुश्री मीरा जैन
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈