☆ पुस्तकांवर बोलू काही ☆
☆ हनिमून आजी-आजोबांचा ☆ मनोगत – सौ.गौरी गाडेकर ☆
लेखिका – सौ.गौरी गाडेकर
प्रकाशक – मधुश्री प्रकाशन
किंमत – रु 300
लिंक >> हनिमून आजी-आजोबांचा! – मधुश्री प्रकाशन (madhushree.co.in)
सौ.गौरी गाडेकर
मनोगत
नुकताच माझा , ‘हनिमून आजी-आजोबांचा’ हा विनोदी कथासंग्रह प्रसिद्ध झाला.
यातील सुरुवातीच्या काही कथांचे नायक-नायिका आहेत आजी-आजोबा. अनेक वर्षांच्या सहजीवनानंतर नात्यामध्ये प्रेम आणि मतभेद यांचा सुंदरसा गोफ तयार होतो. ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून गमेना,’अशी परिस्थिती होते . त्यातून निर्माण होतात असे गमतीदार प्रसंग. खरं तर आजी, आजोबांच्या दृष्टीने गंभीर असले तरी इतरांना हसवणारे.
नंतरच्या कथा इतर नात्यांच्या गुंते उलगडणाऱ्या.
आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रसंगातून विनोदाचा पदर अलगद मोकळा करून हे कथाविश्व उभारलंय.
नेहमीच्या समस्याग्रस्त, धकाधकीच्या जीवनातील ताणतणावांवर उतारा असणारं हे पुस्तक वाचकांच्या पसंतीला नक्कीच उतरेल, याची मला खात्री वाटते.
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈