श्री विजय गावडे
कवितेचा उत्सव
☆ आम्ही जाहलो पुन्हा लहान! ☆ श्री विजय गावडे ☆
म्हातारपण, छे दुसरं बालपण
अनुभवू आनंदून
साठी पुढील नवं वय
आता तर सुरु झालंय!
रेल्वे आपली समजदार
विंडो सीट अन बर्थ लोवर
आवडायचं ना बालपणी
बसावयाला खिडकीवर!!
काम काही खास नाही
उठावयाची घाई नाही
टिफिन नाही, तिकीट नाही
मस्टरची मस्ती नाही!!!
नातवंडांना करू गोळा
खेळू नाचू करू आनंदसोहळा
येवो कधीही वैकुंठ बोलावा
तोवर राहो मैत्री ओलावा.
© श्री विजय गावडे
कांदिवली, मुंबई
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈