सौ. सुनीता पाटणकर
मनमंजुषेतून
☆ हर हर महादेव…. ☆ सुश्री सुनीता पाटणकर ☆
बाबासाहेब बळवंत मोरेश्वर पुरंदरे
सांगलीच्या राजवाड्याच्या तीन कमानी,त्यातून आत गेलं की,दरबार हॉल समोरचे,भव्य पटांगण……….
रात्रीचे जेवण लवकर आटोपून,खाली बसण्यासाठी स्वतःच बसकूर पिशवीत घेऊन बरोब्बर साडे सातला घर सोडायच.
पटांगण गच्च भरलेलं,पुढची जागा पकडून बसायचं…………
ठीक म्हणजे ठीक आठ वाजता,बाबासाहेबांच्या व्याख्यानाला सुरुवात……..
छत्रपती शिवाजी महाराजांचे दैदिप्यमान चरित्र उलगडणारं,ओघवत्या, तडफदार, मनामनात चैतन्य फुलवणारं, राष्ट्रभक्तीची तेजोमय ज्योत प्रज्वलित करणारं व्याख्यान
“हर हर महादेव”ची गुंज तनमनात…….
ते म्हणायचे, “छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथे, जिथे पाऊल ठेवलयं, तिथे, तिथे मी पाऊल ठेवलं आहे आणि अखेर आज महाराजांना भेटायला, आपल्यातून ते गेले.
आमच्या लहानपणी आम्हाला गोब्राह्मण, प्रतिपालक, क्षत्रियकुलवतंस, राजाधिराज, छत्रपती शिवाजी महाराज समजले, ते बाबासाहेब तुमच्या मुळेच……
त्यानंतर,”दार उघड बये दार उघड”, म्हणत सायंकाळी सातच्या ठोक्याला तुळजाभवानीच्या आरतीने “जाणता राजा”
या महानाट्याचा पडदा उघडायचा.या महानाट्याने वेड लावलं…….
बाबासाहेब आपण इतकं दिलंय ना आम्हाला. ………..
शब्दांच्या पलीकडल………..
माझ्या सारखी एक सामान्य व्यक्ती, ‘महाराजांची उपासक’, तुमच्या पायावर डोकं ठेऊन नमस्कार करण्याची संधी मला दोनदा लाभली होती. मला खूप धन्यता वाटते. ज्यांच्या पायावर ‘ठक’ ठेवावे, असे पाय खूप कमी असतात.
शिवशाहिरांना मानाचा मुजरा! साष्टांग दण्डवत!!!!!!
सुनीता@पाटणकर.