सौ. गौरी गाडेकर
मनमंजुषेतून
☆ कृष्णा तुझ्यासवे एक सांजरात दे – लेखिका – सौ.मानिनी महाजन ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
कृष्णा तुझ्यासवे एक सांजरात दे .. प्रीतीची मला एक साद दे
धावत येऊन गळामिठी दे .. तुझ्या पाव्याच्या मंजुळ स्वरात भिजू दे
तुझ्या प्रेमात राधेसम आकंठ बुडू दे .. मीरा होऊन तुझ्यात सामावू दे
कृष्णा तुझ्यासवे एक सांजरात दे……
विसरून जगाला तुझीच होऊ दे .. चंद्राचा झुला अन् चांदण्यांचे लक्ष लक्ष दिवे होऊ दे
मन नौकेत विराजमान होऊन .. प्रीतीची गाज ऐकू दे….
कृष्णा तुझ्यासवे एक सांजरात दे…..
कृष्णा बस फक्त तू आणि मी .. भैरवीचे सूर गाता-गाता भूपातुन तुला आळवू दे
प्रीतीच्या पायघड्यावरून चालताना .. तू माझ्यात नि मी तुझ्यात सामावू दे
कृष्णा तुझ्यासवे एक सांजरात दे …..
प्रेम एवढं अवघड नसतं .. हे जगाला कळू दे….
निर्मळ प्रेमाला विश्वासाची झालर दे .. प्रीतीचे पंख दे.. उडण्याचे बळ दे
श्वास श्वास रंध्र रंध्र कृष्णमय होऊ दे
कृष्णा तुझ्यासवे एक सांजरात दे…….
लेखिका — सौ.मानिनी महाजन, मुंबई
संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈