सौ. सुचित्रा पवार
☆ वाट… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆
‘ वाट ’ या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. पण वाट पहाणे आहे म्हणून माणसाचे चालणे आहे …….
झोपेत दिवस उगवायची वाट ,
अंधारातून चालताना प्रकाशाची वाट ,
दुःखात सुखाची वाट ,
आजारपणात बरे होण्याची वाट ,
दूर गेलेले जवळ येण्याची वाट ,
पक्ष्यांच्या पिलांना चारा घेऊन येणाऱ्या मातेची वाट पाहावी लागते ,
चातकाला पावसाची वाट ,
चकोराला चांदण्यांची वाट ,
तप्त धरतीला चिंब होण्याची वाट ,
शेतकऱ्याला पीक कापणीची वाट ,
गरिबाला श्रीमंत होण्याची वाट ,
परिक्षार्थीला पास होण्याची वाट …
वाट पाहण्याने मनाचा संयम वाढतो, चालण्याला गती मिळते, ऊर्जा मिळते, अन ज्याची वाट पाहतो ती
मिळाल्यानंतरचा अवर्णनीय अक्षय आनंदही !
— पण ज्याची वाट पाहतोय ते वेळेत मात्र भेटायला हवे…,.. नाहीतर वाट पहाणे संपून वाटच हरवते ….
© सौ.सुचित्रा पवार
तासगाव, सांगली
8055690240
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈