सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 172
💥 होली पर्व विशेष – रंग… 💥 सुश्री प्रभा सोनवणे ☆
आजकाल रंग बोलतात माझ्याशी,
गुलाबाचा केशरी मला
खूप आवडतो
खुडताना तीच ती,
काट्याची गोष्ट सांगतो!
मोग-याला माळून होताच
गंधधुंद,
शुभ्र रंग सात्विकतेची
आठवण करून देतो !
प्रत्येक झाड नेहमीच
प्रेमाने साद घालते,
सावलीतली हिरवाई
खूप काही बोलत रहाते !
सृष्टीतील सप्तरंग,
चमकतात तनामनातून…
रंग पंचमी साजरी होतच असते
शब्दा शब्दातून!
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈