डॉ. रवींद्र वेदपाठक

☆  आक्रोश  ☆

(प्रस्तुत है डॉ रवीन्द्र वेदपाठक जी की एक आक्रोशात्मक अभिव्यक्ति इस मराठी कविता  “आक्रोश” में।) 
आता नकोय मला
ती अश्रुंची किनार
चंडी होवुन आक्रोशाचा
मीच करणार आहे संहार….!! १ !!
अशोकवनातील सीता जरी
संयमाने बांधली होती
आक्रोशाचा बांध फुटताच
सारी धरती फाटली होती…..!! २ !!
मोहमयी सत्तेच्या गांधारीला
आंधळेपणाने जरी बांधले होते
द्रौपदीचे केस सुध्दा
दुशा:सनाचे रक्त प्यायले होते…..!! ३ !!
दिसत असली शांती तरी
हि युध्दाची नांदी समजावी
आमच्या गळणाऱ्या आक्रोशातुन
ज्वालामुखीची ठिणगी भडकावी…..!! ४ !!
आता मी सहन करणार नाही
ते अपमानाचे विखारी घोट
आता मी विझणार नाही
बनुन नुसतेच राखेचे गरम लोट…….!! ५ !!
आता मी फोडणार आहे
ज्वालामुखी माझ्या अंतरातील
ज्यातुन उसळुन येतील
लाव्हा होवुन अश्रु माझ्या डोळ्यातील….!! ६ !!
आता नकोय मला
ती अश्रुंची किनार
चंडी होवुन आक्रोशाचा
मीच करणार आहे संहार….!! १ !!
© डॉ. रवींद्र वेदपाठक
*तळेगाव*
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Lasane Ranjana

अप्रतिम स्त्री मनाची अचूक पकड घेणारी कविता जणूपरिवर्तनाची नांदी