सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 127
☆ नववर्ष येवो असे… ☆
वृत्त- वल्लभा🍀
चैत्रातली ही पालवी वा-यावरी झुलते अशी
सृष्टीतला हा सोहळा डोळ्यामधे मिरवू कशी ?
रंगीत या पानाफुला सांगेन मी त्या भावना
मेंदी अशी खुलणार की हातावरी नवचेतना
नववर्ष हे येईल ही सारे जुने सांगायला
गुलमोहरा, तो मोगरा येईल ही महकायला
येथे घडो आता पुन्हा काही पुराणे या भूवरी
त्या वल्लरी बहरोत अन येवो नवा धन्वंतरी
हा पाडवा येवो अशी घेऊन काही देणगी
सा-या जगा लाभो पुन्हा ती औषधी हो बहुगुणी
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
धन्यवाद संपादक मंडळ आणि हेमंत सर🙏