सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 138
☆ आजचे अभंग… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
किती अहंकार।असतो मनात
दर्प स्वभावाचा । जाईचना ॥
अरे विठूराया। गळो हे मीपण
आलेले बालंट। भयंकर ॥
पितळ उघडे। कधीचे पडले
तरीही तो-यात। रहावे का ?
ज्याने तारीयले। चिखली बुडता
ज्ञान त्यासी देती। पोहण्याचे ॥
टाळीले सर्वांना। लिहिताना लेख
सारेच कर्तृत्व । स्वतःचेच ॥
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈