सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “साडीपुराण…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक 

साड्याच साड्या….

*

आज आमच्या सरकारांनी

 कपाट घेतलं आवरायला,

 साड्यांचा मोठा ढीग पाहून

 मी लागलो मोजायला… !

*

कॉटनच्या आहेत सोळा

 त्यांचा झालाय चोळामोळा,

 सिल्कच्या आठ

 त्यांचा तर लई थाट… !

*

वर्कच्या बारा

 त्यांचा खूप तोरा,

 काठापदराच्या पंधरा

 सारे सण करतात साजरा… !

*

लग्नातल्या पैठणीनंतर

 वाढदिवसाला एक घेतलेली,

 पैठणीची हौस चार

 सेमी पैठणीनेच भागवलेली… !

*

फक्त बघू म्हणून दुकानात

 जेव्हा हाताला लागल्या मऊ,

 सुताला खूप छान म्हणून

 सहज आणलेल्या नऊ… !

*

काळा रंग तर

 आवडीचा फार,

 सहज दिसल्या म्हणून

 घेतलेल्या चार… !

*

असं मोजता मोजता

 एकूण झाल्या पंच्याहत्तर,

 आता मात्र मला तर

 यायला लागली चक्कर… !

*

तरीही कुठे जाताना

 सरकारांचं तोंड सुरू,

 आहे का चांगली एकतरी

 सांगा साडी कोणती नेसू… ?

*

अशी त्यांची अवस्था

 नेहमीचीच असते,

 ठेवायला नसली जागा

 तरी नेसायलाही साडी नसते… !

*

तोपर्यंत येतोय आमच्या

 वाढदिवस लग्नाचा,

 मला भारी साडी पाहिजे

 असा आतापासूनच हेका… !

*

असंच सर्व बायकांचं

 साडीवर खूप प्रेम असतं,

 नवऱ्याला कसं पटवायचं

 हे मात्र प्रत्येकीलाच जमतं… !

*

असं हे साडीपूराण

 कायमचंच चालायचं,

 रागावल्यासारखं करायचं

 आणि बायकोच्या

आवडीच्या साड्या घ्यायचं…. !

कवी : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments