सौ. मंजुषा सुनीत मुळे
📚 वाचताना वेचलेले 📖
☆ “फक्त तुम्ही स्वतः व्यवस्थित रहा – –…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
तुम्ही एकही झाड लावू नका,
ती आपोआप उगवतात,
तुम्ही फक्त – ती तोडू नका…
तुम्ही कुठलीही नदी स्वच्छ करू नका,
ती प्रवाही आहे,
स्वतः स्वच्छच असते,
तुम्ही फक्त – तिच्यात घाण टाकू नका…
तुम्ही शांतता प्रस्थापित करण्याच्या नादी लागू नका, सर्वत्र शांतताच आहे,
तुम्ही फक्त – द्वेष पसरवू नका…
तुम्ही प्राणी वाचवण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही,
ती क्षमता निर्सगात आहे,
फक्त – त्यांना मारू नका,
जंगले जाळू नका…
तुम्ही माणसं काहीही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू नका,
सर्व व्यवस्थितच आहे,
फक्त तुम्ही – स्वतःच व्यवस्थित राहा…
— — निसर्ग…
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈