सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ यमाssss (कविता)….प्रमोद जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

यमा, तुलाच फाशी द्यावी,

एवढा मोठा आहे गुन्हा !

बिपिन रावतांसारखी माणसं,

होत नाहीत पुन्हा-पुन्हा !

 

हेवा एवढा वाटला का रे?

नृसिंहाची बघून धमक !

काळालाही भिती वाटेल,

अशी नजरेमधे चमक !

 

इतके पर्याय असतानाही,

सुगंधावर टाकलास फास?

खादी नाले-डबकी आहेत,

त्याना केवढा कुबट वास !

 

बघ अख्खा देश यमा,

वीरासाठी करतोय शोक !

वाटलं नव्हतं क्रूरतेचं,

एवढं कधी गाठशील टोक !

 

वाचवणाराच नेऊन यमा,

केवढं मोठं केलंस पाप !

घरी जाशील तेव्हा कळेल,

बाप तुला देतोय शाप !

 

देवानीच का आदेश काढला?

स्वर्गच निर्धोक व्हावा म्हणून !

तिथला मुख्य सेनानीही,

बिपिन रावत हवे म्हणून?

 

सावित्री तर आजचीसुद्धा,

सत्यवानासोबत गेली !

चिरंजीवच हळद-पिंजर,

आठवणीनं सोबत नेली !

 

इथल्या मातीमधले संस्कार,

इथल्या मातीमधलं शौर्य !

चोरून नेमकं केलंस काय?

सिद्ध केलंस आपलंच क्रौर्य !

 

 -प्रमोद जोशी, देवगड.

9423513604

संग्राहक – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments