वाचताना वेचलेले
☆ आभार माना… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
जीवनात तुम्हाला ज्या लोकांमुळे त्रास झाला अशा लोकांचे सुद्धा आभार माना, कारण त्याच लोकांमुळे आयुष्यात कसं वागायचं व कसं जगायचं हे अचूकपणे शिकायला मिळतं.
समोरच्या व्यक्तीने तुमच्याबरोबर काय आणि का केले हा विचार करण्यात वेळ दवडू नका. कारण तुमच्या जागी त्याचे कर्मच त्याला उत्तर देईल व त्याला त्याच्या कर्माची फळं भोगण्यासाठी भाग पाडेल. कधीकधी शांत राहणे खूप गरजेचं असतं. आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मागायची नसतात.
लक्षात ठेवा– जेव्हा तुम्ही आकाशात उंच उडत असता तेव्हा लोक तुमच्या दिशेने दगड फेकतील. अशावेळी खाली बघू नका, तर अजून उंच उडा. त्यामुळे त्यांनी भिरकावलेले दगड तुमच्यापर्यत पोहोचणारच नाहीत. जर परिणामांचा विचार करत बसाल तर आलेला क्षण निसटून जाईल आणि प्रत्येक क्षण जगून पाहिलात तर परिणाम स्विकारायला सोपं जाईल.
श्री सोमेश्वर व्यसन व मधूमेहमुक्ती मार्गदर्शन केंद्र लोटे ता.खेड जि.रत्नागिरी
संग्राहक : श्री अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈