डॉ. ज्योती गोडबोले
वाचताना वेचलेले
☆ जराशी गंमत —… ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆
फक्त तुझ्या गंधाने
मम मोह अनावर होतो
रसनेचा लगाम सुटतो
मी सहज ओढला जातो।
पाहुन पिवळी तव कांती
मी अति भुकेला होतो
हातात यायच्या आधी
नजरेने खाऊन घेतो।
मग पाव पांघरूनी वरती
लसणीची चटणी भरूनी
तळल्या मिरचीच्या संगे
मी तुजला उचलून घेतो।
प्रकृती स्वास्थ्य वाद्यांचा
किती विरोध झाला तरीही
हे प्रेम न माझे घटते
आस्वाद तुझा मी घेतो।
— बटाटवड्याचे एव्हढे अप्रतिम वर्णन आजपर्यंत कोणी केले नसेल —
संग्राहिका : डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈