वाचताना वेचलेले
☆ कळावे… ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆
पत्र लिहून झाल्यावर आपण खाली लिहितो “कळावे”
“कळावे” याचा पत्रातील आधीच्या मजकुराशी काही संबंध असतोच असे नाही.
खरंतर पत्राचा समारोप मजकुराशी सुसंगत शब्दांनी व्हायला हवा उदाहरणार्थ:
१) प्रिय,
तू ज्या रस्त्याने जात आहेस
तो खूप डेंजर आहे.
वळावे……..
२) मित्रा,
तुझ्या प्रेयसीचा भाऊ
तुला फटकवायला येत आहे.
पळावे……
३) प्रिय,
तुझ्या आवडीच्या कांदा भज्यासाठी
अडीच किलो कांदे पाठवित आहे.
तळावे……
४) प्रिय मित्रा,
मी फोर व्हीलर घेतली
जळावे……
५) प्रिय,
तुझ्यासाठी स्पेशल गहू पाठवित आहे.
दळावे……
६) प्रिय आई,
तुला नको असलेली मुलगी घरात सून म्हणून आणणार आहे.
छळावे……
७) मित्रांनो,
इतक्या उदाहरणानंतर तरी माझा मुद्दा बरोबर आहे हे तुम्हाला
कळावे……
आणि तुम्ही हसुन हसून
लोळावे…..
मेसेज आवडला तर इतरांच्या नंबर वर
वळवावे….
रिपीट झाला असेल तर
वगळावे….
लेखक : अज्ञात
संग्रहिका : मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈