वाचताना वेचलेले
☆ स्त्री शिवाय माणूस अपूर्णच !!!… ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆
स्त्री शिवाय माणूस अपूर्णच !.. बघा ना…
शिक्षण घेत असताना ‘ विद्या ‘
नोकरी उद्योग करताना ‘ लक्ष्मी ‘
अंतसमयी ‘ शांती ‘!
सकाळ सुरु होते तेव्हा ‘ उषा ‘
दिवस संपताना ‘ संध्या ‘!
झोपी जाताना ‘ निशा ‘
झोप लागली तर ‘सपना’!
मंत्रोच्चार करताना ‘ गायत्री ‘
ग्रंथ वाचन करताना ‘ गीता ‘ !
आपुलकीच्या काळी ‘ नम्रता ‘
उद्विग्न पणात ‘ शितल ‘
मंदिरात ‘ दर्शना ‘ ‘ वंदना ‘ ‘ पूजा ‘ ‘आरती ‘अर्चना
…. शिवाय ‘ श्रद्धा ‘ तर हवीच !
वृद्धपणी ‘ करुणा ‘ .. पण ‘ ममता ‘ सह बरं
आणि राग आलाच तर ‘ क्षमा ‘ !
जीवन उजळविण्यासाठी ‘उज्ज्वला’
कठोर परीश्रम म्हणजे कांचन व साधना !
आणि सर्वात महत्वाचं ….
प्रश्न सोडवायचा असेल तर सुचली पाहिजे ती “कल्पना”
आनंद मिळविण्यासाठी ‘कविता’ आणि कविता करण्यासाठी ‘प्रतिभा’ !
आणि .. अशा “कविता” रचण्यासाठी असावी लागते जवळ ती “प्रज्ञा”
लेखक : अज्ञात
संग्रहिका : मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈