श्री सुहास रघुनाथ पंडित
वाचताना वेचलेले
☆ – सगळं मला कळतं बाबा… – कवयित्री – सुश्री प्रणिता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
☆
सगळं मला कळतं बाबा
खूप खूप दमलास तू
जिद्द पुरी करता करता
प्रमाणाबाहेर थकलास तू.
☆
‘पेक्षा’जास्त ही अपेक्षा
नकोच आता काही काळ
तू मी,… मी तू…
आणि आपली संध्याकाळ !
☆
कातरवेळी सांगीन गोष्ट
उतरून जाईल सारा शीण
मांडीवरती डोकं ठेऊन
विसरुन सारं गाssढ नीज.
☆
गोष्टी मधल्या सात पर्या
आणतील खाऊ तुझ्यासाठी
तुला जवळ घेऊन होईन
तुझ्यापेक्षा थोsडी मोठी.
☆
टेकीन माझे ओठ अलगद
तुला झोप लागल्यावर
विश्वामधल्या सर्वात सुंदर
सर्वश्रेष्ठ चषकावर !
☆
कवयित्री – सुश्री प्रणिता कुलकर्णी
पुणे
२२/११/२०२३
संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈