वाचताना वेचलेले
☆ ‘ती’ आणि ‘ही’… ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆
मालिकेतील ‘ ती ‘ आणि जीवनातील ‘ ही ‘ यांचा काही मेळ बसत नाही
मालिकेतील ‘ती’ नीटनेटकी राहते.
स्वयंपाक घरात जरीच्या साड्या घालते.
सण नसले तरी दागिने चढवते…..
जीवनातील ‘ही’ केसाचा अंबाडा बांधते.
स्वयंपाक घरात गाऊनमध्ये वावरते.
सणालाही दागिने घालण्यास कानाडोळा करते.
मालिकेतील’ ती’ जीवनातील ‘ही’
ह्यांचा काही मेळ बसत नाही …….
मालिकेतील’ ती’ला नवरा प्रेमळ मिळतो.
वाढदिवशी स्वयंपाकघरात येऊन आलिंगन देतो.
संध्याकाळी हॉटेलमध्ये जाऊन सेलिब्रेट पण करतो…..
जीवनातील’ ही’ला नवरा नवर्यासारखा मिळतो.
वाढदिवसाचे हिला लक्षात आणून द्यावे लागते .
संध्याकाळी हिला सर्वांच्या आवडीचा मेनू बनवावा लागतो.
मालिकेतील’ ती’ जीवनातील ‘ही’ ह्यांचा काही मेळ बसत नाही……..
मालिकेतील ‘ती’ला सणाचे कोडकौतूक असतं.
सणाला ‘ती’ न दमता सर्व काही व्यवस्थित दिसतं.
प्रत्येक सणाला संपूर्ण कुटुंब कार्यरत असतं…..
जीवनातील ‘ही’ला सण आला की दमायला होतं.
एक एक वस्तू जोडतांना नाकीनऊ येतं.
‘कोणी सण तयार केले ‘?ह्या विचाराने मन दमतं
मालिकेतील ‘ती’ जीवनातील ‘ही’ हयांचा काही मेळ बसत नाही…….
मालिकेतील ‘ती’ भाम्रक जीवन दाखवत राहते.
जीवनातील ‘ही’ त्यात स्वतःला चाचपडत राहते.
मालिकेतील ‘ती’ काही न करता जिंकत राहते.
जीवनातील ‘ही’ सर्व करुन हारत राहते.
मालिकेतील’ ती’ जीवनातील ‘ही’ ह्यांचा काही मेळ बसत नाही……..
ह्यांचा काही मेळ बसत नाही……..
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈