📖 वाचताना वेचलेले 📖
☆ काही विचार… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री उषा नाईक ☆
- परफेक्ट जोड्या फक्त चपलाच्या असतात. बाकी सगळ गैरसमज आहे.
- कचरापेटीत पडलेली भाकरीच सांगते की माणूस पोट भरलं की त्याची लायकी विसरतो.
- जेवताना शेतकऱ्याचे आणि झोपताना सैनिकाचे आभार मानायला विसरू नये.
- कोणतेही कर्म करा, पण एक गोष्ट विसरु नका. परमेश्वर नेहमी ONLINE असतो.
- SORRY माणसाने म्हटले की भांडण संपते आणि डॉक्टरनी म्हटले की माणूस संपतो.
- नातं हृदयातून असावं. रक्ताची नातं हल्ली वृद्धश्रमात सापडतात.
- लाकडाच्या ओंडक्यांनी भरलेल्या ट्रकच्या फळीवर लिहिले होते ‘झाडे लावा झाडे जगवा. ‘
- नाती जिवंतपणीच सांभाळा. ताजमहल जगाने पाहिला, पण मुमताजने नाही.
- चमचा ज्या भांडयात असतो, त्यालाच तो रिकामा करतो. चमच्यापासून सावध रहा.
- उपवास नेहमी अन्नाचाच का करता? कधी कधी क्रोधाचा आणि वाईटाचाही करा.
- भावना ही जगातील सर्वात खतरनाक नदी आहे. ह्यात सगळे वाहून जातात.
लेखक :अज्ञात
प्रस्तुती :सौ. उषा नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈