श्री अमोल अनंत केळकर
विविधा
☆ कुंकू/ टिकली डे ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆
#NoBindiNoBusiness
या शेफाली ताईंनी सुरु केलेल्या उपक्रमावरुन काही महिन्यापूर्वी लिहिलेला लेख आठवला
अर्थात त्यांचा उद्देश आणि या लेखाचा उद्देश अगदी वेगळा आहे
पण असंच चालू राहिले तर हा काल्पनिक लेख सत्यात यायला वेळ लागणार नाही
=======================
रिपोस्ट ?
कुंकू / टिकली डे *
(काल्पनिक, पण सध्या पहाण्यात येणा-या निरीक्षणावरुन *)
कुंकू किंवा टिकली ला इंग्रजीत काय म्हणतात हे माहित नाही त्यामुळे तेच लिहून पुढे ‘डे’ असं लिहिलय.तुम्हाला माहित असेल तर ते नाव टाकून बदल करायला हरकत नाही. बाकी बरेच जागतीक पातळीवरचे ‘डे’ उदा फादर, मदर, फ्रेंडशीप, चाँकलेट, कटलेट, वडा, सामोसा, योग डे इ.इ.इ हे माहित आहेत.
तर मंडळी, आजपासून पुढे ५० वर्षांनी कुठल्या अमेरिकन / युरोपियन संस्थेने केलेल्या पाहणीतून कपाळावर कंकू / टिकली लावणे कसे शास्त्रीय आहे हे सिध्द होऊन जुलै महिन्यातील “फूल मून” च्या जवळच्या रविवारी हा कुंकू/ टिकली डे अतीशय उत्साहात साजरा होईल यात शंका नाही. असा डे साजरा होताना कुणाच्या तरी एकदम लक्षात येईल की अरे ही तर मूळ आपलीच परंपरा आहे. त्या खास दिवसानिमित्य मग चँनेलवर “माझा कूंकवाचा कट्टा” यावर खास चर्चासत्र किंवा विविध ठिकाणी चर्चा सत्रे रंगतील. आठवडाभर स्पेशल सेल मधे अँमेझॉन किंवा तसल्याच कुठल्याही संकेत स्थळावरुन मागवलेले कुंकू/ टिकल्यांचे combo पॅक एव्हांन घरपोच मिळायला लागले असतील. आपण घेतलेले डिझाईन, किंमत शेअर केली जाईल. एखादी मैत्रीण दुस-या मैत्रिणीला उद्या माझा सेल्फीच बघ, एकदम हटके डिझाईन मागवलय असं सांगून आपण काय मागवलय हे गुलदस्त्यातच ठेवेल.
सोशल मिडीयावर याचे महत्व सांगणारे अनेक निबंध लिहिले जातील, दूरदर्शन वर कुंकू सिनेमा तर काही चॅनेलवर कुंकू मालिकेचे भाग दाखविले जातील आणि इतर अनेक स्पेशल ‘डे ‘ सारखा हा दिवस तेवढ्यापुरता साजरा होऊन संपून जाईल.
काही येतय लक्षात? असो.
लेखनाचा शेवट नेहमीप्रमाणे टुकार ओळींनी
परंपरे पुरती ‘टिकली’
अन् अस्मितेचे ‘कंकू’
आधुनिक सावित्रींचे म्हणणे
तरीपण
आम्हीच जिंकू
आम्हीच जिंकू
आम्हीच जिंकू
??
#टिकलीतरटिकली
#NoBindiNoBusiness
अमोल
© श्री अमोल अनंत केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com